राजकारण

आता प्रियंका गांधींचं घर तोडण्याच्या मागणीला जोर

9 Sept :- हिमाचलची कन्या, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकारमधील शिवसेना नेता संजय राउत यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात मुंबईत बीएमसीने कंगना रणौतच्या कार्यालयाच्या एका भागाची तोडफोड केली. बीएमसीने मंगळवारी बेकायदेशीर बांधकामाचं नोटीस पाठवलं होतं.यानंतर बुधवारी सकाळी पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयात हजर होती. यावेळी त्यांनी सकाळी तोडफोड करण्यास सुरुवात केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

यावेळी 100 कामगार हजर असल्याचे सांगितले जात आहे.कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालय तोडल्याच्या विरोधात ट्विटरवर लोकांनी हिमाचलच्या शिमला येथील काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे घर तोडण्याची मागणी सुरू आहे. एका यूजरने ट्वीट करीत लिहिलं आहे की, शिमलामध्ये काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांचं बेकायदेशीर घर आहे, हेदेखील तोडायला हवं. या पोस्टवर युजर्सनी मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना टॅग केलं आहे. आणि लिहिलं आहे की – शिमलामध्ये काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांचं घरदेखील बेकायदेशीर आहे. हे देखील तोडायला हवं.

वाचा :- कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!

प्रियंका गांधी यांनी येथे शानदार घर तयार केलं आहे, मात्र याला जमीन कशी मिळाली माहित नाही. एक महिला यूजरने लिहिलं आहेकी, हिमाचल सरकारलाही हिमाचलमध्ये प्रियंका गांधीचं घर तोडायला हवं.किलोमीटर दूर आणि समुद्रतळापासून 8 हजार फूट उंचीवर आहे. हे घर पहाडी शैलीत तयार करण्यात आलं आहे. इंटीरियरमध्ये देवदारच्या लाकडांनी सजावट केली आहे. घराच्या चहूबाजूंनी हिरवळ आणि पाइनची सुंदर झाडं आहेत. समोर हिमालयाची डोंगररांगा दिसतात. छराबडा हे एक पर्यटन स्थळ आहे.

 वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!