कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!
9 Sept :- मुंबई महापालिकेनं BMC ऑफिसवर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत संतप्त झाली. तिने शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला. शिवाय आधीपासूनच कंगना बॉलिवूडला सातत्याने टार्गेट करत आली आहे. त्यामुळे आता बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कंगना ही महाराष्ट्राची पुढची मुख्यमंत्री होईल, असं दिसतं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कंगनाने आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलं आहे. राम गोपाल वर्मा म्हणाले, “कंगना नक्कीच महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री होईल असं दिसतं आहे आणि असं झालं तर सर्व बॉलिवूडवासियांना TIMBEKTOO मध्ये स्थलांतरित व्हावं लागेल”कंगनाने बीएमसीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष्य केलं.
वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
“तू जे केलं ते चांगलं केलं. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझं घमेंड तुटेल. काश्मिरी पंडितांवर काय परिस्थिती आली असेल, याचा अंदाज आज मला आला. अयोध्येवर चित्रपट करेन, काश्मीरवरही करेन. माझ्याबरोबर आज जे झालं, ते चांगलंच झालं”, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.