भारतीय मीडियाला पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ मोठा सल्ला!
8 Sept :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, सध्या अशी वेळ आहे की जेथे भारताचा आवाज आणि लोकल वस्तू ग्लोबल होत आहेत. भारताच्या मीडिया इंडस्ट्रीलाही ग्लोबल होण्याची गरज आहे.भारताचे लोकल प्रोडक्ट ग्लोबल होत आहेत. भारताचा आवाजही अधिक ग्लोबल होत असल्याचे दिसत आहे. जगात भारताचा आवाज आवर्जुन ऐकला जात आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्ममध्ये भारताचं अस्तित्व खूप दांडगं आहे. अशा परिस्थितीत भारतीय मीडियानेही ग्लोबल व्हायला हवं, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं आहे.कोरोनाच्या काळात मीडियाने अभूतपूर्व मार्गाने काम केलं आहे आणि नागरिकांना कोरोनाबाबत जागृत केलं आहे. त्याबरोबरच सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवले आहेत.
वाचा :- सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती अटक!
वेळेप्रसंगी मीडियाने सरकारवर टीकाही केली आहे. मात्र प्रत्येकाला टीकांमधून शिकायचं असतं..अशातूनही आपली लोकशाही बळकट होईल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.दुसरीकडे भारत-चीन तणावादरम्यान भारताने चीनविरोधात अनेक कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने 7.3 लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन निर्यातीच्या कामासाठी अॅपल आणि सॅमसंगला मंजुरी दिली आहे.तर दुसरीकडे भारतीय मोबाइल फोन मेकर्स माइक्रोमॅक्स, लावा, कार्बन, ऑप्टीमस आणि डिक्सन सारख्या कंपन्या भारतात स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत आहेत.
वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
केंद्र सरकारने या सर्व कंपन्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे चीनच्या कंपन्यांना मोठा झटका बसणार असून भारतीय बाजारात त्यांचा दबदबा संपुष्टात येईल.
वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!