रियाला किती वर्षांची होणार शिक्षा?
8 Sept :- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्श्न प्रकरणी अखेर आज रिया अटक झाली. एनसीबीने ही कारवाई केली आहे. आज चौकशीच्या तिसऱ्या दिवशी एनसीबीने रियाला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीताही समावेश आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला एनडीपीसी 20 बी कलमांनुसार दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 27 अंतर्गत एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर कलम 22 अंतर्गत दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी आधीच सांगितलं होतं की, रियाने कधीही ड्रग्स घेतले नाहीत. पण रियाची गौरव आर्य बरोबरच्या 2017 च्या चॅटमध्ये तिने एमडीएमए घेतल्याचं समोर आलं आहे.
वाचा :- सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती अटक!
एमडीएमए हे असं ड्रग आहे की कुणाकडे हे अर्ध्या ग्रॅमपेक्षा जास्त आढळल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात.सुरुवातीला जेव्हा तपास यंत्रणेने रियाला विचारले की तुम्ही ड्रग्स घेता का, तेव्हा ती म्हणाली की ती ड्रग्ज घेत नाही. त्यानंतर म्हटलं की सुशांतसिंग राजपूत जेव्हा ड्रग्स मागवायचा त्यावेळी घेतलं होतं. याचा अर्थ रियाने सुशांतसिंग राजपूतवरील प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता.
वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!
विशेष म्हणजे, NCB ने मोबाइल चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा प्राप्त केला होता, ज्यामध्ये हे लोक बंदी घातलेल्या ड्रग्सची खरेदी करत असल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांतील या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने या तिघांना अटक केली आहे.