‘या’ राज्यात होणार मोफत कोरोनाची टेस्ट
8 Sept :- देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये कोरोना व्हायरस चाचणीसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.यापुढे मध्य प्रदेशात कोरोना संसर्गाची तपासणी मोफत करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने हा निर्णय़ घेतला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
संपूर्ण प्रदेशात मोफत कोरोना टेस्ट करण्यासाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून 3700 पर्यंत करण्यात येईल. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या 11700 पर्यंत करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारने 700 आयसीयू बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.शिवराज सरकारच्या निर्णयानुसार राज्यात कोरोना व्हायरस महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालयात बेड्स वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्वालिअर आणि जबलपूरमध्ये बेड्सची संख्या सर्वात वाढविण्यात येईल.
वाचा :- सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती अटक!
कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने कोरोना संसर्गासाठी प्रदेशभरात जागरुकता अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नगरीय आणि पंचायत विभाग, शहर, आणि गावात प्रचार अभियान सुरू करण्यात येईल. सरकारने दावा केला आहे की सध्या 30000 जनरल बेड्स आहेत. याची संख्या वाढविल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल.देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 42 लाख 80 हजार 423 झाली आहे. असे असले तरी आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सतत 90 हजारहून अधिक रुग्ण सापडत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. तर, आज 1133 रुग्णांचा मृत्यू झाला.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 72 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 74 हजार 123 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, एकूण निरोगी रुग्णांची संख्या 33 लाख 23 हजार 951 आहे. तर, देशात 8 लाख 83 हजार 697 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.वाचा :-
वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!