मुलीला जन्म देऊन जन्मदात्यांनी काढला पळ
देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 80000 टप्पा गाठत आहे. ही आकडेवारी भीती वाढवणारी आहे. दुसरीकडे अनेक जन्मजात बाळांमध्येही कोरोनाची लागण होत असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. मात्र झारखंडमध्ये घडलेली ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. झारखंडची राजधानी रांची स्थित रिम्स सुपर स्पेशालिटी विंगमध्ये दाखल केलेल्या एका 18 दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे कुटुंबीय त्याला रुग्णालयातच सोडून गेले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
चार दिवसांपूर्वी बाळाच्या आई-वडिलांना अनेकदा सांगूनही ते तिला घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत. अशावेळी रिम्सच्या डॉक्टरांनी स्वत:च्या जबाबदारीवर बाळाचा जीव वाचविण्याचे ठरवलं.यामध्ये डॉक्टरांना काही स्वयंसेवी संघटनांनीही मदत केली. सोमवारी नवजातवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही यशस्वी झाली आहे. सध्या बाळाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पेडिआर्टिक सर्जन डॉ. अभिषेक रंजन यांनी सांगितले की मुलीच्या शरीरातील आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र अद्यापही मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
हे वाचा :- सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती अटक!
डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आहे, मुलीकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर तिची प्रकृती सुधारेल.नवजातला रिम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी केली तर मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर विश्रामपुरमध्ये राहणारे आई-वडिल नवजातला रुग्णालयात सोडून आले. रिम्सने याची सूचना रांची जिल्हा प्रशासनाला दिली. रांची प्रशासनाने याबाबत नवजातच्या आई-वडिलांना सांगितले, मात्र ते आले नाही, तर मुलीचे आजी-आजोबा रुग्णालयात पोहोचले. आता मुलीचे आजी-आजोबा तिचा सांभाळ करीत आहेत.
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!