सिनेमा,मनोरंजन

सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती अटक!

8 Sept :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यास वैतागून आत्महत्या केली होती.या आत्महत्यांचे मागे अखेर काय कारण असावं याचा पोलीस तपास होते.हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार,दिग्दर्शक,चित्रपट निर्मात्यांची देखील चौकशी करण्यात आली होती.सुशांतची प्रियसी रिया चक्रवर्ती या प्रकरणात गुन्हेगार असल्याची शंका व्यक्त केली जात होती.सुशांतच्या कुटुंबातून,मित्र परिवारातून,सुशांतच्या चाहत्यांकडून रिया चक्रवर्तीला अटक करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

अनेक वृत्त वाहिन्यांनी रिया चक्रवर्तील वाचवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र अखेर रिया चक्रवर्तीला अटक काण्यात आले आहे.सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB ने उडी घेतली आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केलं आहे. एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.

वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

रविवारी सुरू असलेल्या चौकशीत एनसीबीची टीम रियाला अटक करेल असं वाटत होतं मात्र रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आलं. अखेर मंगळवारी संध्याकाळी एनसीबीने रियाला अटक केली. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत.

वाचा :- नागरिकांनो,कोरोना चाचणी झाली स्वस्त; जाणून घ्या नवे दर!


सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली.

वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.

वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!

रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर केलं जाणार असून अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27 (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने रियाला NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे रियाला पुढील काही दिवस NCB कोठडीत आणि नंतर जेलमध्ये काढावे लागणार हे नक्की.

वाचा :- जगाच्या नजरा आता ‘या’ 5 कोरोना लसींवर!