Popular News

जगाच्या नजरा आता ‘या’ 5 कोरोना लसींवर!

7 Sept :- गेल्या 6 महिन्यांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोनाचं थैमान अवघ मानवी आयुष्य विस्कळीत करूनही अजुन थांबलेलं नाही.जगात 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे.प्रत्येक देश कोरोना विषाणूशी होईल तसा संघर्ष करून आयुष्य जगत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रत्येक देशाची यंत्रणा नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्याकरिता आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्याकरिता आहोरात्र कष्ट घेत आहे.प्रत्येक माणूस कोरोना विषाणूच्या दहशदीखाली आयुष्य जगत आहे. त्यामुळे लस केव्हा येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

हे वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!

त्यामुळे कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यातल्या काही प्रयोगांना यशही मिळालं आहे.WHO जागतिक आरोग्य संघटना अशा 188 प्रयोगांवर लक्ष ठेवून आहे. त्यातले 35 प्रयोग प्रगतीपथावर आहेत.तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.त्यानंतर अमेरिकन कंपनी Pfizer, चिनी कंपनी सिनोफार्म, भारतातली बायोटेक, रशियाची स्पुटनिक-V, या लशींचे परिणाम सकारात्मक येण्याची शक्यता आहे.

हे वाचा :- ‘या’ कारणामूळे कंगना विरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा

अजुनही किमान 8 महिन्या त्यासाठी लागण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्ण चाचण्या झाल्याशीवाय जागतिक आरोग्य संघटना अशा औषधांना मान्यता देणार नाही असं WHOने सांगितलं आहे.

हे वाचा :- गुगल प्ले स्टोअरने आणखी हटवली ‘ही’ 6 धोकादायक अ‍ॅप्स!