महाराष्ट्र

नागरिकांनो,कोरोना चाचणी झाली स्वस्त; जाणून घ्या नवे दर!

7 Sept :- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात कोरोना टेस्टचे दर आणखी कमी केले आहे. कोरोना चाचणीसाठी आता फक्त 1200 रुपये द्यावे लागतील. 800 ते 600 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी आता आता जास्तीत जास्त दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना टेस्टसाठी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 1200 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन सॅम्पल दिल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.याआधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टसाठी आता जास्तीत जास्त 2800 रुपये इतका दर आकारला जात होता.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता.भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता 11.70 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी (4,95,51,507) इतका आहे . गेल्या 24 तासात 0देशात 7,20,362 चाचण्या करण्यात आल्या. देशभरात चाचण्यांची गती आणि व्याप्ती वाढवल्यामुळे, केवळ गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या.

हे वाचा :- धक्कादायक! कोरोना 2023 पर्यंत राहणारच

राज्यात दुसऱ्यांदा कोरोना टेस्टची किंमत कमी करण्यात आली आहे. अगदी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. मात्र त्यानंतर राज्य सरकारने हे दर कमी केले आणि 4500 रुपयांऐवजी जास्तीत जास्त 2200 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये आकारण्यात आले. दरम्यान आता हे दर आणखी कमी झाले आहेत.

हे वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!