महाराष्ट्र

‘त्याने’ फटीतून पहिले, अन गेला तुरुंगात!

7 Sept :- समाजामध्ये सध्य परिस्थितीत अनेक विचित्र घटना घडत आहेत. सुनिल गंगाधररराव वेदपाठक यांनी आरोपी मयुर कैलासचंद खंडेलवाल (40) रा. मारवाडी गल्ली, जाफराबाद ता. जाफराबाद जि. जालना यांस फिर्यादीच्या घराच्या दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहात असल्याच्या आरोपाप्रकरणी 1 वर्षांची शिक्षा व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल 7 सप्टेंबर रोजी दिला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 20 मे 2015 रोजी यातील फिर्यादी ही रात्री तिचा मुलगा सोबत अंगणात बाहेर झोपलेले होते व फिर्यादीच्या तरुण अविवाहित मुली या घरात झोपलेल्या असतांना यातील आरोपीने फिर्यादी व तिचे कुटूंब या अनुसूचित जाती जमातीतील मांग जातीची आहे, हे माहित असतांना देखील आरोपीने अपरात्री 2 वाजता फिर्यादीच्या घरी जावून दरवाजाच्या फटीतून फिर्यादीने मुलीकडे वाईट इराद्याने लगट करण्याचे उद्देशाने डोकावून पाहत कवाडाच्या फटीतून हात घालून दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न केला व यापुर्वी सुध्दा आरोपीने चार ते पाच वेळेस रात्री अपरात्री फिर्यादीच्या घरी जावून खिडकीतून फिर्यादीच्या मुलीस डोकावून पाहत एक प्रकारचा फिर्यादीच्या मुलीचा पाठलाग करुन त्यांना अपमानित करुन फिर्यादीचा जातीचा अपमान केला.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने जाफराबाद पोलीस ठाण्यात दिल्यावरुन आरोपीविरुध्द भादवी 354-अ (1), 354- ड, 457 सह अनुसुचित जाती जमाती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन संबंधीत पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पंच, पिडीत मुलगी, घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि तपासिक अंमलदार विशाल गायकवाड आणि दिक्षीतकुमार गेडाम हे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले व यांच्या साक्षी अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या.

हे वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!

सदर प्रकरणात न्यायालयात साक्षपुराव्यात आरोपीविरुध्द ठेवण्यात आलेला दोषारोपापैकी फक्त फिर्यादीच्या घराच्या दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहात असल्याच्या आरोपाप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. उर्वरित आरोपात आरोपीची मुक्तता केलेली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे वाल्मिक आ. घुगे यांनी बाजु मांडली. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने ठााह्य धरुन आरोपीस 1 वर्षाची शिक्षा व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास आरोपीस साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

हे वाचा :- धक्कादायक! कोरोना 2023 पर्यंत राहणारच