सिनेमा,मनोरंजन

अर्जुननंतर मलायका सुद्धा कोरोनाच्या घेऱ्यात

7 Sept :- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील कोरोना संक्रमित आहे. अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. आता अर्जुनपाठोपाठ मलायकानेदेखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिनं स्वत: दिली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मलायका सध्या डान्स रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर्समध्ये जज म्हणून दिसते. या कार्यक्रमाच्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित झाल्याचं समजलं आणि आता मलायकादेखील कोरनना संक्रमित आहे. तिला कोरोना झाल्याचं निदान रविवारी झालं. दरम्यान आज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

मलायका म्हणाली, “माझा कोरनाव्हायरस टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या प्रकृतीबाबत तुम्हाला माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. मी ठिक आहे आणि माझ्यामाध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. तसंच मी डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचं, सल्ल्याचं पालन करते आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार मी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. तुम्ही सर्वदेखील आपल्या घरी राहा आणि सुरक्षित राहा असं आवाहन मी करते”

हे वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!