महाराष्ट्र

शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!

शिक्षण खात्याने घेतला मोठा निर्णय

7 Sept :- सप्टेंबर महिन्यानंतरही शाळा सुरू झाल्या नाहीत तर अभ्यासक्रमात पुन्हा कपात करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचे दिवस वाया गेल्याने शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासाचे नियोजन व्यवस्थितरित्या व्हावे यासाठी 40 ते 50 टक्के अभ्यासक्रम शिकविला जाण्याची शक्यता आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 टक्क्यांची कपात यापूर्वीच केली असून कोरोनामुळे मे महिन्यात सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षाला अधिक विलंब झाला आहे. तसेच 120 दिवसांचे शैक्षणिक वर्ष करण्याचा निर्णय घेत अभ्यासक्रमात तीस टक्‍के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लवकर शाळा सुरू होणार नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात पुन्हा कपात करण्याचा विचार सुरू सुरू आहे.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यागम योजनेंतर्गत शिक्षक गावांमध्ये जाऊन विध्यार्थ्यांना शिकवीत आहेत. याला काही ठिकाणी चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र शाळा सुरू झाल्याशिवाय शैक्षणिक वर्षाची घडी व्यवस्थित बसणार नाही. यासाठी शाळा लवकर सुरू होणे आवश्यक आहे.

हे वाचा :- कंगनाशी पंगा पडला महागात;शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल!

शिक्षण खात्याच्या वेळापत्रका प्रमाणे 29 मे पासून शाळांना सुरवात होणार होती. मात्र कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास मोठा विलंब झाल्याने दहावी व बारावीच्या विध्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे. त्यामुळे दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देताना अडचण होणार असल्याने लवकर शाळा सुरू व्हाव्यात अशी मागणी विध्यार्थ्यांमधून होत आहे. तसेच अभ्यासक्रमात कपात झाली तरी कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षकांचीही धावपळ होणार आहे.

हे वाचा :- IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर;सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार!