News

बिंदुसरा धरणात सापडला मृतदेह

बीड शहरातील धानोरा रोड येथील रहिवासी असलेला एक २३ वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेत तरुणाचा शोध सुरू केल्यानंतर या तरुणाची मोटारसायकल बीड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली येथील बिंदुसरा तलावाजवळ आढळून आल्यानंतर पोलिसांना धरणात बुडाल्याचा संशय आल्यानंतर रविवारी सकाळपासूनच पोलीस व अग्निशमन दलाकडून शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती.

त्यानंतर आज सकाळी बीड ग्रामीण पोलिसांना या तरुणाचा मृत अवस्थेत देह सापडला असून अद्याप पर्यंत पुढील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. सुजित बडे यांनी दिली आहे.