पारधी समाजाच्या 2 गटातील हाणामारीत दोघांचा मृत्यू!
6 Sept :- पारधी समाजाच्या दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत तालुक्यातील देवधानोरा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.६) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.दरम्यान या हाणामारीत मृत्युमुखी पडलेल्या मयताचा मुलगा,पत्नी व अन्य एक असे तिघाजनाला गंभीर मार लागल्याने उसमनाबादच्या शासकीय रुग्णलयात औषधपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी शिराढोन पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
पोलिसानी दिलेल्या माहितीवरून मागील भांडणाची कुरापत काढुन मंगरूळ शिवारातील पारधी वस्तीवरील मोठा जमाव देवधानोरा शिवारात दाखल झाला.शेती व जुन्या भांडणाची कुरापत काढत या जमावाने देवधानोरा येथील पारधी समाजजातील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.हातात काठ्या,कुऱ्हाडी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात संतोष शिवाजी पवार (वय-१८) व शिवाजी बिचवा पवार (वय-४५) याचा जागीच मृत्य झाला तर यांच्या कुटूंबातील पत्नी, मुलगा व अन्य एक असे तिघाजनाला गंभीर मार लागल्याने याना उसमनाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
दरम्यान घटनास्थळी अतिरीक्त पोलिस आधिक्षक संदीप पालवे , उपविभागीय पोलिस आधीकारी सुरेश पाटील,येरमळा, शिराढोन येथील सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून मयत दोघांना येथील उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.रात्री उशिरा पर्यत शिराढोन पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
हे वाचा :- IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर;सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार!