कंगनाशी पंगा पडला महागात;शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल!
अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेनेवर केलेल्या हल्लाबोलनंतर विविध नेत्यांनी तिच्याविरोधात वक्तव्य केले होते. मुंबई पोलीसांवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपासासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत मुंबई आता पीओके सारखी वाटू लागल्याचे कंगनाने म्हटले होते. याबद्दल जागोजागी शिवसेनेने आंदोलन केले होते.मात्र, शिवसैनिकांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आमदार अंबादास दानवे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्रांतीचौक येथे ४ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगनाविरोधात घोषणा बाजी केली होती.
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
आंदोलनात जमलेल्या शिवसैनिकांनी कंगनाच्या मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात केलेल्या वक्तव्याचाही निषेध केला होता. मात्र, या प्रकरणात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले नव्हते. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष अशी खबरदारीही घेण्यात आली नव्हती.
हे वाचा :- डॉ.मुंडेंच्या अवैद्य कृत्याने पुन्हा परळीसह बीड जिल्हा हादरला!
परिणामी या प्रकरणात शहर पोलिस आयुक्तांच्या जमाव बंदीचे उल्लंघन करणे, विनापरवाना निर्दशने केल्याप्रकरणी सहायक फौजदार कचरू रामराव निकम यांच्या फिर्यादीवरून आमदार अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गिरजाराम हळनोर, सचिन खैरे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण जाधव, पप्पू कुलकर्णी यांच्यासह महिला कार्यकर्ता आणि अन्य एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा :- IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर;सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार!