महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाच्या थैमानाचा टॉप गेर!

6 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र कोरोना विषाणूच्या थैमानाने टॉप गेर उचलला आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.साध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

राज्यात 24 तासांमध्ये तब्बल 23 हजार 350 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर 328 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यू दर 2.92 एवढा झाला आहे. दिवसभरात 7826 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.03 एवढं आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212वर गेली आहे.राज्यात 2 लाख 35 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा :- IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर;सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार!