क्रीडा

IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर;सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार!

6 Sept :- इंडियन प्रीमियर लीग ipl 2020 चे संपूर्ण शेड्यूल जारी करण्यात आले आहे. आयपीएलच्या 13 व्या सीझनची सुरूवात 19 सप्टेंबरला अबुधाबीत होईल. उद्घाटनाच्या मॅचमध्ये मागच्यावेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स एमआय आणि उपविजेती टीम चेन्नई सुपर किंग्स सीएसके यांच्यात सामना होईल. यानंतर रविवार 20 सप्टेंबरला दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सामना होईल.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सोमवार 21 सप्टेंबरला सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु हे दुबईत भिडतील. मंगळवार 22 सप्टेंबरला शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने असतील.दुबईत आयपीएलच्या सर्वात जास्त 24 मॅच खेळल्या जातील. अबुधाबीत 20 मॅच आणि शारजाहमध्ये 12 मॅच खेळवण्यात येतील. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने म्हटले आहे की, प्लेऑफ आणि फायनलच्या सामन्यांचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

भारतीय क्रिकेट बोर्डाने मोठ्या प्रतिक्षेनंतर रविवारी इंडियन प्रीमियर लीग ipl चा कार्यक्रम जारी केला आहे. भारतात कोविड-19 ची प्रकरणे वाढल्याने जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगचे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमीरात युएई च्या तीन ठिकाणी दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये करण्यात येत आहे.

हे वाचा :- नागरिकांनो, आधार कार्डमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने होणार दुरुस्ती!

ipl फायनल 10 नोव्हेंबरला
टूर्नामेंट 19 सप्टेंबरपासून सुरू होऊन 53 दिवस चालेल. आयपीएल फायनल 10 नोव्हेंबरला होईल. यावेळी आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवसात दोन मॅच) सामाने खेळवले जातील.

हे वाचा :- सावधान! राज्यात ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे हादरे

सायंकाळचे सामने 7:30 वाजतापासून
यावेळी आयोजकांनी आयपीएल मॅचच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटे पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाचे सामने आता सायंकाळी 4 वाजताऐवजी दुपारी 3:30 वाजता सुरू होतील. सायंकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील. जे पूर्वी 8 वाजतापासून होत असत.

हे वाचा :- गुगल प्ले स्टोअरने आणखी हटवली ‘ही’ 6 धोकादायक अ‍ॅप्स!