बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!
6 Sept :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी पोहचली आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यातून तब्बल 3859 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.
हे वाचा :- डॉ.मुंडेंच्या अवैद्य कृत्याने पुन्हा परळीसह बीड जिल्हा हादरला!
आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण 5216 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 148 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल आसलेल्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 1209 आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 8.2% आहे.तर रिकव्हरी रेट 73.98 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!