डॉ.मुंडेंच्या अवैद्य कृत्याने पुन्हा परळीसह बीड जिल्हा हादरला!
डॉक्टर रूपातील राक्षस गजाआड!
6 Sept :- डॉ. सुदाम मुंडे म्हटले की डॉक्टर रुपातील राक्षस असे सर्वत्र हमखास बोलले जाते.कारण २०१२ साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. पण जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही या म्हणी प्रमाणे या प्रकरणातील शिक्षेनंतरही डॉ. सुदाम मुंडे वटनीवर आले नव्हते.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
डॉ. सुदाम मुंडे यांनी पुन्हा अवैद्यरित्या आपल्या स्वतःच्या शेतातच विनापरवांगी गर्भपात करण्याचे पाप सुरु केले.पण शेवटी पापाचा घडा भरतोच. पोलिसांना काल रात्रि डॉ. सुदाम मुंडेच्या गोपनीय अवैद्य कृत्याची माहीती भेटताच पुलिसांनी तातडीने जाऊन डॉ. सुदाम मुंडे यांना लागलीच ताब्यात घेतले आहे.
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
अवैद्य गर्भपात करण्याचे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.डॉ. सुदाम मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुलिसांनी डॉ. सुदाम मुंडे यांना अटक केली आहे.
हे वाचा :- नागरिकांनो, आधार कार्डमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने होणार दुरुस्ती!
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह शेकडो अधिकारी आणि कर्मचारी यांनी या रुग्णालयावर छापा घातला .त्यावेळी बोगस डॉ सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयात चार रुग्णावर उपचार सुरू असल्याचे आढळून आले .तसेच गर्भपात करण्यासाठीचे साहित्य, औषधी मोठ्या प्रमाणात आढळून आले.
हे वाचा :- सावधान! राज्यात ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे हादरे
या प्रकरणी डॉ मुंडे यांच्याविरुद्ध इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट 1956 चे 15 (2),महाराष्ट्र मेडिकल प्रकटीशनर ऍक्ट 1961 चे कलम 33 (2),भादवी 353,188,269,270,278,419,420,175,179,504,आप त्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब),साथ रोग प्रतिबंधक कायदा चे कलम 2,3,4,वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे कलम 3,4,5,मुंबई सुसृशा नोंदणी कायदा 1949 चे कलम 3 (2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे .
हे वाचा :- नागरिकांनो, आधार कार्डमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने होणार दुरुस्ती!
सविस्तर वृत्त उद्याच्या दै.झुंजार नेता मध्ये वाचा…!
हे वाचा :- गुगल प्ले स्टोअरने आणखी हटवली ‘ही’ 6 धोकादायक अॅप्स!