महाराष्ट्र

सावधान! राज्यात ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे हादरे

5 Sept :- यंदाचं सुरु असलेलं २०२० वर्ष संपूर्ण मानव जातीकरिता शापित असल्याचे भासू लागले आहे. कोरोना विषाणूचा सर्वत्र हाहाकार सुरु असताना राज्यात चक्री वादळ देखील कहर करून गेले.मानवी आयुष्य पूर्ण विस्कळीत आणि उध्वस्त होत आले असून अजूनही कोरोना विषाणूचे थैमान शमण्याचे नाव घेत नाहीए.आणि आता भूकंपाच्या हादऱ्यांची माहिती समोर आल्याने राज्यात सर्वत्र नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात मागील 12 तासात 3 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नाशिकमध्ये रात्री जवळपास 12 वाजता दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले तर मुंबईमध्ये एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. आज सकाळी 6.36 मिनिटांनी मुंबईपासून 98 किमी उत्तरेला 2.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. नाशिकमध्ये याची तीव्रता अधिक होती.

हे वाचा :- …अखेर चक्रवर्तीला अटक!

नाशिकमध्ये शुक्रवारी रात्री 11.41 मिनिटांनी 4 रिक्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर 12.05 मिनिटांनी 3.6 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाच्या झटक्यात कोणतेही नुकसान झाले नाही.मागील महिन्यातच पालघर येथे देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र हे धक्के जास्त तीव्रतेचे नसल्याने याचे परिमाण जाणवले नाहीत.तरीही नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार