मोदींची IPS अधिकाऱ्यांना चपराक;सिंघम बनण्याचा आव आणू नका!
5 Sept :- ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होवू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा आयपीएस अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी म्हटलं की काही पोलिस अधिकारी सुरुवातीपासूनच दिखावा करत राहतात आणि त्या नादात पोलिसांच्या मुख्य कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. पंतप्रधान मोदी म्हणाले की,”नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
लोकांनी आपल्याला घाबरलं पाहिजे आणि समाजकंटकांनी आपलं नाव ऐकताच थरथर कापलं पाहिजे ही गोष्ट त्यांच्या डोक्यात फिट होते. आणि त्यामुळेच जी काही मुख्य कर्तव्य करायची असतात त्याकडे दुर्लक्ष होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!
त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा देखील सल्ला दिली.कोरोना काळात पोलिस प्रशासनाने केलेल्या कामाची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोरोना काळात पोलिस प्रशासनाचा मानवी चेहरा समोर आला. त्यांनी लक्षणीय काम केले.
हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार
कोरोनासंबंधी लोकांत जागरूकता वाढवण्यासाठी गाणी गायली, लोकांच्या जेवनाची सोय केली आणि रूग्णांना दवाखान्यात पोहचवण्याचे काम केले. कोरोना काळात मानवतेने खाकी वर्दीच्या रूपात काम केल्याचे सगळे लोक साक्षीदार आहेत.
हे वाचा :- …अखेर चक्रवर्तीला अटक!