राजकीय वर्तुळात नवी चर्चा;पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा!
5 Sept :- राजकीय वर्तुळात सध्या नवी चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या या सूचनेनें राजकीय वर्तुळात या चर्चेला चांगलेलंच उधाण आणले आहे.काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी असंही त्यांनी म्हटलं होतं.मात्र त्यासाठी कुणीही तयार नाही.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!
काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र ती त्यांनी मान्य केली नाही.तर गुलाम नबी आझाद यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. या पत्राने काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झालं होतं.आता पुढचे सहा महिने सोनिया गांधी याच अध्यक्ष राहणार असून त्यानंतर निवडणुका होणार आहेत.
हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार