रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
4 Sept :- रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस टोचल्यानंतर ४२ दिवसानंतरही कोणतेही गंभीर साइड इफेक्टस जाणवले नाहीत. त्याशिवाय ही लस २१ दिवसांत शरिरात अॅण्टीबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
वैद्यकीय नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दोन भाग असलेल्या लशीत दोन adenovirus वेक्टर्स आहेत. त्यामुळे SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एडेनोवायरस वैक्टरचा वापर दीर्घ काळापासून करण्यात येत आहे. अनेक क्लिनिकल अभ्यासात ही लस सुरक्षित असल्याचेही समोर आले होते. सध्या अनेक कोविड-१९ ची कँडिडेट लस वेक्टर्सचा वापर करत SARS-CoV-2 चा स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतात.जुलै महिन्यातही ऑक्सफोर्डच्या लस चाचणीच्या निकालातही लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याचे समोर आले होते.
हे वाचा :- काळजी घ्या! हिवाळ्यात वाढणार कोरोनाचा प्रादुर्भाव
दुसऱ्या चाचणीच्या परिणामातही ही लस २८ दिवसांमध्ये टी सेल (अॅण्टी बॉडी) निर्माण करण्यास सक्षम आहे.रशियाची लस चाचणी ही दोन रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये १८ ते ६० वर्षापर्यंतच्या निरोगी व्यक्तींचा समावेश होता. चाचणीसाठी या व्यक्तींची नोंदणी करण्यात आल्यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आले होते. त्यानंतर लस टोचण्यात आल्यानंतर २८ दिवसांपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. लशीचे आणखी मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, आजारी व इतर आजार असलेल्या लोकांना लस देऊन परिणामांचे संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.
हे वाचा :- मी येत आहे,ज्याच्या बापामध्ये दम आहे त्याने मला रोखून दाखवा!
दरम्यान, रशियाने करोनाला अटकाव करणाऱ्या लशीला मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी यावर आक्षेप घेत शंका व्यक्त केली होती. तर, ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला होता. मात्र, चाचणीची माहिती जाहीर केली नव्हती. वाढत्या दबावानंतर रशियाने ४० हजार स्वयंसेवकांना लस देणार असल्याचे सांगत परदेशी संस्थेच्या देखरेखीखाली ही चाचणी होणार असल्याचे जाहीर केले होते. रशियाने करोनावरील पहिल्या लशीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ असे ठेवले आहे. जगात सोव्हिएत रशियाने पहिल्यांदा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह सोडला होता. त्याच्याच नावावरून या करोना लशीला नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता दुसरी लसही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!