सिनेमा,मनोरंजन

उत्सुकता संपली! ‘ही’ अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका

4 Sept :- ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभासने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून सिनेमाचं एकेक पोस्टर टाकायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमात लंकेश सैफ अली असणार असल्याचं जाहीर केलं. हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. यात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. राम जर प्रभास असेल तर लक्ष्मण आणि सीता कोण असणार याची उत्सुकताही अनेकांना आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रामायणात अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो राम, सीता, लक्ष्मण, रावण, दशरथ आदींचा समावेश होतो. या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत असणार आहे. तर सैफ रावणाच्या भूमिकेत असेल. आता या सिनेमात सीतेच्या भूमिकेत कियारा आडवानी असेल. कियाराने यापूर्वी कबीर सिंग, गुड न्यूज या सिनेमात कामं केली आहेत. तिच्या या दोन्ही सिनेमातल्या भूमिकांचं मोठं कौतुक झालं आहे.

हे वाचा :- मी येत आहे,ज्याच्या बापामध्ये दम आहे त्याने मला रोखून दाखवा!

आता तिला आदिपुरुषमध्ये सीता बनून येण्याची संधी मिळाली आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे. या सिनेमात इतर व्यक्तिरेखा कोण कोण साकारणार आहे ते अद्याप नक्की नाहीय. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा असल्याने अनेक चांगले, तगडे कलाकार या सिनेमातल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणार आहेत. या सिनेमाचं बजेटही साडेतीनशे कोटींचं असेल असं बोललं जातं.

हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!

ओम राऊतने दिग्दर्शित केलेल्या तान्हाजी – द अनसंग वॉरिअर या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने साडेतीनशे कोटींची कमाई केली होती. त्यात अजय देवगण आणि सैफ अली यांची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. सैफ आणि ओम राऊतची हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा आदिपुरुष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी उत्तरार्धात रसिकांच्या भेटीला येईल असं बोललं जातं.

हे वाचा :- काळजी घ्या! हिवाळ्यात वाढणार कोरोनाचा प्रादुर्भाव