महाराष्ट्र

महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!

4 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येति कि काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 19 हजार 218 रुग्णांची वाढ झालीय. आत्तांपर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे.

हे वाचा :- काळजी घ्या! हिवाळ्यात वाढणार कोरोनाचा प्रादुर्भाव

कोरोनाचा प्रसार आता ग्रामीण भाग होत असून मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 1929 रुग्ण आढळले.राज्यात दिवसभरात 378 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 13 हजार रुग्ण बरे होऊन घरी. सगळे व्यवहार सुरु झाल्याने ही संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

हे वाचा :- मी येत आहे,ज्याच्या बापामध्ये दम आहे त्याने मला रोखून दाखवा!