भारत

काळजी घ्या! हिवाळ्यात वाढणार कोरोनाचा प्रादुर्भाव

4 Sept :- कोरोना विषाणूने संपूर्ण मानव जातीचे दैनंदिन जीवन पार विस्कळीत करून टाकले आहे.देशभरात प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात,शहरात,ग्रामीण भागात सावत्र कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर संख्येत विस्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रुग्ण संख्या वाढत असतांनाच शिमल्याच्या IGMC हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जनक यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती डॉ. जनक यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी जास्तित जास्त काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.हिवाळ्यात ओलावा जास्त असल्याने कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रसाराची भीती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास होतो. त्यामुळे प्रदुषणापासून दूर राहत काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला.गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं तर आजारापासून दूर राहता येतं असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

कोरोना विषाणूवर मात करणारी अद्याप तरी कुठलीच लास निघालेली नसल्याने खबरदारी घेतल्यास कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वतःचा बचाव करता येणे शक्य आहे.त्यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेणे सध्यातरी आत्यावश्य्क आहे.

हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!