बीड

एसपी पोद्दार यांचा आणखी 3 गुंडांना हद्दपारीचा दणका!

4 Sept :- बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी शर्थीचे प्रयत्न चालबले आहेत. गुंडगिरीचे,समुळ उच्चाटन करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन वेगवेगळया कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे योजले आहे. त्यातुनच जिल्हयातील पोलीस यंत्रनेला पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-56 प्रमाणे हद्दपारचे जास्तीत जास्त प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी,बीड यांच्याकडे पाठविण्याचे आदेशीत केले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

त्यामध्ये पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकारी,बीड यांच्याकडे बीड विभागातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते, त्यापैकी पोस्टे पेठबीड व बीड ग्रामीण या ठाण्यांमधील 03 प्रस्तावमधील इसमांना उपविभागीय दंडाधिकारी,बीड यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-56 प्रमाणे बीड जिल्हयातुन दोन वर्षांकरीता खालील इसमांना हद्दपार केले आहे.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

  1. प्रदिप रामेश्वर सौदा रा. बलभीमनगर बीड या आरोपी विरुध्द गैरकायादयाची मंडळी जमवुन मारहान करणे, व दुखापती करणे, अवैध शस्त्र बाळगने असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. 2, शालींदर रामेश्वर सौर्दा रा, वतारवेस बलभीमनगर पेठबीड या आरोपी विरुध्द गैरकायदयाची मंडळी जमवुन

मारहान करणे, दुखपम करणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, 3. सुमीत सुर्यकांत ऊर्फ बाबुराव नलावडे रा. शाहुनगर बीड या आरोपी विरुध्द सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करुन कामास आडथळा करणे, दारुबंदीचे गुन्हे दाखल आहेत.

या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींताविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-५६ प्रमाणे प्रस्ताव प्रभारी अधिकारी यांनी तयार करुन मा.पोलीस अधीक्षक,बीड यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी,बीड यांच्याकडे पाठविल्यानंतर कायदेशीर बाबी पुर्ण करुन झालेनंतर उपविभागीय दंडाधिकारी,बीड यांनी नमुद हद्दपार प्रस्तावातील ०३ इसमाचे हद्दपारीचे आदेश काढले आहे. सदरची कारवाइ पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक, बीड श्री.विजय कबाडे, उपविपोअ बीड

श्री.भास्कर सांवत, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री.भारत राऊत स्थागुशा,बीड, पो.नि.श्री. विश्वास पाटील पो.स्टे. पेठबीड, स.पो.नि. सुजीत बडे पो.स्टे. बीड ग्रामीण यांनी केलेली आहे. भविष्यातही गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमानणाऱ्या इसमा विरुध्द प्रतिबंधात्मक कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए पोद्दार यांनी दिले आहेत.

हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!