सुखद! बीडमधून ‘3732’ रुग्ण कोरोनामुक्त
4 Sept :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी पोहचली आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यातून तब्बल 3732 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!
आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण 4895 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 136 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल आसलेल्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 1047 आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 7.9% आहे.तर रिकव्हरी रेट 75.83 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!
हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!