कंगनाचं मानसिक संतुलन ढासळलं; धनु भाऊ आक्रमक!
4 Sept :- अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबईवर आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्व स्तरांतून तिच्यावर टीका केली जात आहे. कलाकार, सामान्य नागरिक तसेच राजकीय नेत्यांनीही तिच्या विधानाला विरोध केला आहे. सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही कंगणाला सुनावले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
ट्विट करत त्यांनी तिचे मानसिक संतुलन ढासळले असेल, अशी टिका केली आहे.’याच मुंबईने तुमच्या सारख्याच अनेकांना आसरा दिला. ग्लॅमर – करिअरही दिले. एखादी व्यक्ती एतकं कृतघ्न दोनच परिस्थीतीत वागू शकते, एकतंर संस्कारानेच ती कृत्घन घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. या मुंबईने अनेकांच्या पोटाची खळगी भरली आहे.तुमचीही आणि तुम्हाला नावही दिले आणि सारे काही मिळाले ते इथेच’, अशी बोचरी टिका धनंजय मुंडेंनी केली आहे.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. ‘सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!’ असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार
‘बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी’ असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.
हे वाचा :- पबजीनंतर रमी,पोकर गेमवर आणली बंदी!