रशियासोबत भारताने केला मोठा करार!
4 Sept :- भारत आणि चीन दरम्यान लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताने रशियासोबत एक मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मॉस्कोच्या यात्रादरम्यान भारत आणि रशियाने अत्याधुनिक एके-203 रायफल भारतात तयार करण्याबाबत एक मोठा करार केला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आधिकारिक रशियाच्या मीडियानुसार गुरुवारी ही माहिती देण्यात आली. एके-203 रायफल, एके-47 रायफलचा नवीनतम आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. ही ‘इंडियन स्मॉल ऑर्म्स सिस्टम’ (इनसास) 5.56×45 मिमी रायफलची जागा घेईल.
हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!
रशियाच्या सरकारी वृत्त एजंसी स्पुतनिक नुसार भारतीय थल सेनेला तब्बल 770,000 एके-203 रायफलची गरज आहे, ज्यामध्ये 1 लाखांची आयात केली जाईल आणि उरलेल्यांची निर्मिती भारतात केली जाईल.
हे वाचा :- लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश; ‘असा’ होणार फायदा!
रशियाच्या वृत्त एजेंसीच्या बातमीनुसार या रायफल्सना भारतात संयुक्त उद्यम भारत-रशिया रायफल प्राइवेट लिमिटेड अंतर्गत तयार करण्यात येईल. याची स्थापना आयुध निर्माणी बोर्ड आणि कलाशनीकोव कंसर्न वा रोसोबोरेनेक्सपोर्ट यांच्यामध्ये झाली आहे.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!