राजकारण

मंदिरांची दार उघडण्या बाबत मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

4 Sept :- पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.सध्या राज्यातली मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात मागणी होत आहे.

हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!

त्यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, अशी मागणी अनेकांनी केली आहे मात्र त्याबाबत सावधानता बाळगावीच लागेल असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज्य सरकार दबावामध्ये कुठलाही निर्णय घेणार नाही असे संकेतच त्यांनी दिल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

हे वाचा :- लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश; ‘असा’ होणार फायदा!

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होवू देवू नका.

हे वाचा :- महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!