महाराष्ट्र

महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!

3 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यात आता भरमसाठ वाढ होताना दिसू लागली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनक होत चालले आहे.साध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येति कि काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. आज तब्बल 18 हजार 105 नव्या रुग्णांची भर पडली. तर 391 जणांचा मृत्यू झाला. तर 13 हजार 988 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. एकूण 6 लाख 12 हजार 484 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 72.58 एवढं झालं आहे.

हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 43 हजार 844 एवढी झाली आहे.देशात आणि राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असतांनाच महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी गोष्टी पुढे आली आहे. राज्यात गेल्या तीन आढवड्यांमध्ये Active रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.महाराष्ट्रातील Active रुग्णांच्या संख्येत 7 टक्क्यांची घट झाली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.

हे वाचा :- लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश; ‘असा’ होणार फायदा!