‘या’ महिन्यात देशांतर्गत क्रिकेट सुरू होणार- गांगुली
4 Sept :- बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, आयपीएलचे पुढील सत्र एप्रिलमध्ये सुरू होईल. कोविड-१९ मुळे यंदा लीग १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. यादरम्यान इंग्लंड अॅड वेल्स क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) अध्यक्ष कोलिन ग्रेव्सने म्हटले की, बीसीसीआय त्यांच्याकडून हंड्रेड लीगबाबत माहिती घेत आहे. ईसीबी या वर्षी हंड्रेड लीगचे आयोजन करणार होता, मात्र कोरोनामुळे त्याला जुलै २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून विश्वास दिला की, देशांतर्गत क्रिकेट तेव्हाच सुरू होईल, जेव्हा कोरोनानंतर वातावरण सुरक्षित होईल. ऑगस्टमध्ये नियमित घरचे क्रिकेट सुरू होते. मात्र, यंदा अद्याप सत्र सुरू झाले नाही. सत्राची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीने नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते.
हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!
पत्रात म्हटले की, ‘मंडळ कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वातावरण चांगले होताच घरचे क्रिकेट सुरू करू. खेळाडूंसह लोकांचे आरोग्य व सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोविड-१९ च्या परिस्थितीत काही महिन्यांत सुधारणा होईल, असे वाटते.’गांगुलीने सदस्यांना संघाच्या भविष्यातील दौऱ्याबाबत माहिती दिली.
हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!
संघ वर्षा अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २०२१ ची सुरुवात इंग्लंडच्या यजमानात सुरू होईल. भारत पुढील वर्षी टी-२० विश्वचषक व २०२३ मध्ये वनडे विश्वचषकाच्या आयोजनाची तयारी करेल.
हे वाचा :- लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश; ‘असा’ होणार फायदा!