क्रीडा

मुंबई संघाला झटका! ‘या’ खेळाडूची IPL मधून माघार

3 Sept :- आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियंसची अडचण वाढली आहे. संघातील फास्ट बॉलर आणि आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या लसित मलिगांने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाने कौटुंबिक कारणास्तव टुर्नामेंट सोडत असल्याचे सांगितले.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आता मलिंगाच्या जागी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स पॅटिंसनला संधी मिळाली आहे.मुंबई इंडियंसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले की, संघाने यावर्षी आयपीएलसाठी लसित मलिंगाऐवजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स पॅटिंसनला साइन केले आहे.

हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!

मलिंगाने खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे.संघाचे मालक आकाश अंबानीने म्हटले की, जेम्स आमच्यासाठी योग्य पर्याय आहे, त्यांच्या येण्याने आमच्या संघाची गोलंदाजी मजबूत होईल. मलिंगा लीजेंड आहेत आणि मुंबई इंडियंससाठी एक मजबूत पिलर होते. आम्ही त्यांना मिस करतोल.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!