भारत

‘हे’ 5 देश भारताच्या मदतीसाठी राहिले उभा!

3 Sept :-चीनच्या मदतीनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमनं उधळून लावली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा या पाच देशांनी उपस्थित केला.पाकिस्ताननं याआधीही चीनच्या मदतीनं भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावं, यासाठी पाकिस्तानचे चीनच्या मदतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. तसं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलं.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

याआधीही पाकिस्ताननं वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेनं उधळून लावला होता.पाकिस्ताननं एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवून आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. मात्र पाकिस्तानचे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी रोखले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला.याआधीही पाकिस्तानला अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात अपयश आलं होतं.

हे वाचा :- भारताच्या डिजिटल स्ट्राइकनंतर चिनी ड्रॅगन चवताळला!

आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून पाकिस्तानवर निशाणा साधला. ‘दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरक्षा परिषदेनं हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,’ असं त्रिमूर्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा :- लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश; ‘असा’ होणार फायदा!