महाराष्ट्र

अखेर शासनालाही मान्य;श्रीमंतांनी धरले आडून ICU चे बेड!

3 Sept :- राज्यात सध्या covid संकट सगळीकडेच वाढत आहे अशा काळात खाजगी शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड देखील मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक स्वतःच्या आर्थिक ताकदीवर गरज नसताना ICU बेड घेत असल्याचं धक्कादायक वास्तव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र अनेकांचा कल खाजगी रुग्णालयाकडे आहे. खाजगी रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याचं समोर आला आहे.अशा परिस्थितीमध्ये अनेक गरजवंतांना ICU व्हेंटिलेटर याची गरज असताना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर बोलतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी काही श्रीमंत धनाढ्य लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

विशेष म्हणजे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिक लक्ष देत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात COVID टेस्ट कमी होत असल्याची टीका केली होती. आरोग्य मंत्र्यांनी मात्र फडवणीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

हे वाचा :- चीनवर सर्जिकल स्ट्राईक;भारतात पबजीसह 118 अप्सवर बंदी!

केंद्र सरकारच्या ICMRच्या नियमावली नुसारच राज्यात सर्वत्र चाचण्या घेतल्या जात आहेत तसेच इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातने टेस्ट जास्त केल्या असल्याही माहितीही त्यांनी दिली.कोविड टेस्टचे दर अजून कमी करणार असून साधारण 1200 तेेेे 1400 रुपयांपर्यंत पर्यंत दर आणले जातील अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

हे वाचा :-पोलीस दलात फेरबदल; विश्वास नांगरे पाटील पुन्हा मुंबईत!