महाराष्ट्र

महाराष्ट्राचे धक्कादायक कोरोना अपडेट!

2 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बुधवारी नव्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 17 हजार 433 जणांची भर पडली. तर 13 हजार 959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 493 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 01 हजार 703 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

बुधवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे.

हे वाचा :- चीनवर सर्जिकल स्ट्राईक;भारतात पबजीसह 118 अप्सवर बंदी!

राज्यात सध्या covid संकट सगळीकडेच वाढत आहे अशा काळात खाजगी शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड देखील मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक स्वतःच्या आर्थिक ताकदीवर गरज नसताना ICU बेड घेत असल्याचं धक्कादायक वास्तव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

हे वाचा :- पोलीस दलात फेरबदल; विश्वास नांगरे पाटील पुन्हा मुंबईत!