महाराष्ट्र

पोलीस दलात फेरबदल; विश्वास नांगरे पाटील पुन्हा मुंबईत!

2 Sept :- पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार याबाबत महिन्याभरापासून अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. मात्र गणेशोत्सवादरम्यान ही न करता पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी झाली. राज्य सरकारच्या आदेशानुसार, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती झाली आहे. तर, नांगरे पाटील यांच्या पदावर दीपक पांडे हे पदभार स्विकारणार आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सध्या राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल केले आहे. सरकारने 40 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती झाली आहे.

हे वाचा :- चीनवर सर्जिकल स्ट्राईक;भारतात पबजीसह 118 अप्सवर बंदी!

नाशिकमध्ये त्यांच्या जागी दीपक पांडे हे पदभार स्वीकारणार आहे. याशिवाय नाशिक परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षक पदी बदली झाली आहे. प्रताप दिघावकर हे आता विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.याशिवाय नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षकपदी बदली झाली असून, प्रताप दिघावकर हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्णप्रकाश हे सांभाळणार आहेत. तर, अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!