भारत

धक्कादायक! IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच चालवली गोळी

2 Sept :- अत्यंत नावाजलेले IPS अधिकारी हिंमाशू रॉय यांनी मुंबईत राहत्या घरी स्वत:वरच गोळी झाडली होती. त्यांनी आपल्या तोंडात गोळी चालवली होती. कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांनी स्वत:वर 2018 मध्ये गोळी चालवून आत्महत्या केली होती. यानंतर आता खळबळजनक बातमी समोर आली आहे.आणखी एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच गोळी चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आरपी शर्मा आहे. त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी चालवली आहे. ही गोळी त्यांच्या मानेला लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना कोलंबिया एशिया रुग्णालयात हलविण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती.

हे वाचा :- चीनवर सर्जिकल स्ट्राईक;भारतात पबजीसह 118 अप्सवर बंदी!

त्यांनी नवीन अनेक मोठ्या प्रकरणात काम केलं आहे. बीएसवाय मंत्रिमंडळातील गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरपी शर्मा यांनी आत्महत्या केली नाही. चुकून गोळी बंदुकीतून सुटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार