भारत

नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात सुद्धा एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचा दर 594 रुपयांवर स्थिर आहे. अन्य शहरांमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. मात्र, 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे.

आयओसीच्या वेबसाइटवर दिलेल्या प्राईसनुसार, दिल्लीत 19 किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर 2 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यापूर्वी जुलैमध्ये 14 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 4 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती.देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीच्या वेबसाइटनुसार दिल्लीत सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. मागील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये जे दर आहेत तेच सप्टेंबर महिन्यासाठी राहतील.

दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा विना अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर आहे. अशाच प्रकारे मुंबईत विना अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. मात्र, चेन्नईत किंमत 50 पैसे प्रति सिलेंडर कमी होऊन आता 610 रुपयांवर आली आहे. तर, कोलकातामध्ये गॅस सिलेंडरची किंमत 50 पैसे प्रति सिलेंडर वाढली आहे.

19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी घसरून 1133 रुपयांवर आली आहे.

कोलकातामध्ये 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1198.50 रुपयांवरून घसरून 119650 रुपयांवर आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1091 रुपयांवरून घसरून 1089 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.

देशातील चौथे मोठे महानगर चेन्नईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1253 रुपयांवरून घसरून 1250 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.