राजकारण

अंबेडकरांसह हजारो आंदोलकांवर हा गुन्हा दाखल!

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल 31ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेसोबत मिळून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपूरात आंदोलन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पंढरपूरात येत या आंदोलनात सहभाग घेतला. तर, सोलापूर-पंढरपूर मार्गासह पंढरपूरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

यामुळे वंचितांचे नेते प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह हजारो आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी चौकात कार्यकर्त्यांना रोखण्यात आले होते.या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांनी देखील समर्थन दिले होते. तर, मंदिरातील बडवे मंडळींनी विठ्ठलाची मूर्ती देऊन प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. या आंदोलनावेळी सोशल डिस्टनसिंगचा मात्र पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला होता.