भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक…

1 Sept :- “दिल्लीत पहिल्यांदा आलो, तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी बोटाला धरून शिकवलं होतं,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एकदा सांगितलं होतं. भारतरत्न प्रणबदा राजकीय भिंतीपलीकडचं आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं, अशा शब्दांत मोदींनी प्रणबदांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं वयाच्या 84 व्या वर्षी दिल्लीत आर्मी हॉस्पिटलमध्ये निधन झालं.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रणब मुखर्जी यांचा राष्ट्रपती भवनातला शेवटचा दिवस होता, तेव्हा पंतप्रधानपदी असणाऱ्या मोदींनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. ते स्वतः मुखर्जींनीच जाहीरपणे Tweet केलं होतं. त्या पत्राच्या आठवणी आता सोशल मीडियावर अनेक जण काढत आहेत.माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी मुळात सच्चे काँग्रेसी असले, तरी विरोधी पक्षांचा किंवा विचारांचा त्यांनी कधी दुःस्वास केला नाही.

हे वाचा :- कोरोना लस टोचवताच म्हातारा झाला तरुन!

उलट राष्ट्रपतीपदी असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान होते. तेव्हा त्यांच्या तब्येतीची ते आपुलकीने चौकशी करत. स्वतः नरेंद्र मोदी यांनीच प्रणबदांच्या राष्ट्रपती भवनातल्या शेवटच्या दिवशी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात हा उल्लेख होता. हे पत्र प्रणब मुखर्जी यांनी स्वतः शेअर केलं होतं. या पत्राने आपण भावुक झाल्याचंही प्रणबदांनी म्हटलं होतं.

हे वाचा :- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!

24 जुलै 2017 रोजी मोदींनी प्रणबदांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, ‘तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आलो, त्यावेळी माझ्यापुढे मोठं आव्हानात्मक काम होतं. पण तुम्ही या काळात मला पितृसमान मार्गदर्शन केलंत. तुम्ही दिलेला सल्ला, मार्गदर्शन आणि माझी आपुलकीने केलेली चौकशी यामुळे माझ्यातला आत्मविश्वास आणि बळ वाढलं’मोदींचं हे पत्र वाचून आपण भावुक झाल्याचं प्रणब मुखर्जी यांनी लिहिलं होतं. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी राष्ट्रपतीपदी प्रणबदा होते.

हे वाचा :- UNLOCK 4 ची नियमावली झाली जाहीर!

25 जुलै 2012 ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं असून इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणव मुखर्जी अनेक महत्वाच्या पदावर होते. अनेक महत्त्वाच्या खात्यांचं त्यांनी काम पाहिलं आहे. प्रणव मुखर्जी यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं अनेक वादंग निर्माण झाला होता.

हे वाचा :- ‘या’ कारणामुळे कंगनावर कारवाई करावी!