महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

31 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 11,852 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही 11,158 आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत असलेल्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढते आहे. शिवाय नागपूर, नाशिकमध्येही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच आकडी झाल्याने चिंता वाढली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 7,92,541 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

हे वाचा :- कोरोना लस टोचवताच म्हातारा झाला तरुन!

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.37 टक्के एवढे झालेलं आहे. राज्यात आज 184 रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला असून राज्यातील मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे.राज्यात 13,55,330 व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत, तर 35,722 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण मध्ये आहेत.राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 7,92,541 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 24,583 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,94,056 रुग्ण आहेत.

हे वाचा :- UNLOCK 4 ची नियमावली झाली जाहीर!

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.

हे वाचा :- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!