बीड

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

31 Aug :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या समाधानकारक उच्चांकी पोहचत आहे. तब्ब्ल आजपर्यंत बीड जिल्ह्यातून तब्बल 3244 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण 4523 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.

हे वाचा :- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!

आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 127 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल आसलेल्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 1152 आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 7.5% आहे.तर रिकव्हरी रेट 70.32 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

हे वाचा :- Unlock 4.0 साठी अशी असू शकते राज्य सरकारची नियमावली