भारत

Unlock 4.0 – ‘हे’ असतील नवे नियम!

28 Aug :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर सध्या अनलॉक सत्र सुरु आहे.अनलॉक ३ सध्या समाप्तीच्या उंबरठ्यावर असल्याने भारतातील तमाम नागरिकांना सध्या उत्सुकता लागलेली आहे की अनलॉक 4 चे नियम आणि अटी काय असणार.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

एकंदरीत अनलॉक ४ मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच असणार आहेत, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी आहे.कोचिंग क्लास किंवा इतर कुठल्याही ट्यूशन्स बंदच राहतील.ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी आहे.शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.

हे वाचा :- चेन्नई संघाला धक्का; ‘हा’ दिग्ग्ज खेळाडू Ipl मध्ये नाही खेळणार

वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.गरोदर स्त्रियांनीही गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नये.

हे वाचा :- ‘या’ कारणामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली-गांधी

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.7 सप्टेंबरपासून मेट्रो रेल सुरू होऊ शकते. पण तीही टप्प्या टप्प्याने सुरू होणार.थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंदच.राज्य सरकार परिस्थितीचा अंदाज घेऊन यामध्ये फेरबदल करू शकतात.

हे वाचा :- कोरोना लस टोचवताच म्हातारा झाला तरुन!

कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध कायम राहणार.सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक किंवा राजकीय संमेलनांना परवानगी नाही. पण 21 सप्टेंबरपासून नियम होणार शिथिल.कुठल्याही प्रकरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 100 जणांनी एकत्र यायला 21 सप्टेंबरनंतर परवानगी. पण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरणं बंधनकारक. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान मोजूनच संमेलनाला जायची परवानगी.21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडायला परवागनी.एसी सिनिमा हॉल बंदच राहणार.

हे वाचा :- विचित्र घटना! कोरोनाची धास्तीने गावकरी झाले गायब