राजकारण

‘या’ कारणामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली-गांधी

29 :- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या खालावत जाणाऱ्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली आहे. करोना ही साथ एक दैवी घटना असून यामुळेच जीएसटीवर परिणाम झाला आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या वर्षी आम्ही एका विलक्षण परिस्थितीचा सामना करत आहोत. आम्ही एका दैवी संकटाचा सामना करत आहोत. आम्हाला मंदीचा देखील सामना करावा लागत आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते. यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘भारतीय अर्थव्यवस्ता तीन गोष्टींमुळे उद्ध्वस्त झाली आहे- नोटाबंदी, दोषयुक्त जीएसटी आणि अपयशी लॉकडाउन, या व्यतिरिक्त बाकी सारे खोटे आहे.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

राहुल गांधींपूर्वी CPI (M) ने देखील GST महसूलात घट येण्याबाबतच्या मुद्द्यावर शुक्रवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकार उद्योगपतींना मिळालेले असून व्यर्थ धोरणे आणि कडक दृष्टीकोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ते आता देवाला जबाबदार धरत आहे, असे सीपीआयने म्हटले आहे. पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.गरज भासल्यास सरकार कर्ज घेऊन राज्यांची थकबाकी देऊ शकते.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

राज्य सरकारांनी का म्हणून कर्ज घ्यावे?, काय हे सहकारावर आधारित संघराज्य आहे का?, देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करत राज्यांना लुटले जात आहे, असे येचुरी म्हणाले. उद्योगपतींशी हातमिळवणी, अक्षमता आणि असंवेदनशीतेमुळे करोना येण्याच्या फार पूर्वीपासूनच लोकांचा रोजगार आणि जीवन उद्ध्वस्त झाले होते. आता देवाला जबाबदार धरले जात आहे, असेही येचुरी म्हणाले.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!