राजकारण

ठाकरे सरकार देणार फडणवीसांना झटका!

28 Aug :- मुंबईतल्या आरे मधल्या मेट्रोच्या कारशेडला हलविण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा आणि पर्यावरणवादी संघटनांचा विरोध जुमानत देवेंद्र फडणवीसांना आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला त्यावेळी सत्तेत असतांनाही आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. मात्र हा प्रकल्प तिथून हलविण्याबाबत मुख्यमंत्री ठाम असल्यांच बोललं जातंय.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मुंबईतील मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतल मेट्रो प्रकल्पातील सर्व टप्प्यांची सविस्तर चर्चा झाली. गोरेगावच्या पहाडी भागात मेट्रो कारशेड हलवण्याबाबत राज्य सरकारची मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

मुंबईतील आरे मधील मेट्रो कार शेडला आदित्य ठाकरे यांचा विरोध होता. तेथिल झाडे तोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. आणि सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेड दूसरीकडे हलवण्या संदर्भात त्यावेळी आश्वासनही दिलं होतं. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, आरे इथून मेट्रो कारशेड हलवण्याबाबत हालचालींना सुरुवात झाल्याची माहीती मिळतेय.या प्रकरणी मोठं आंदलनही झालं होतं.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

न्यायालयातही हे प्रकरण गेलं होतं. यावर पुन्हा विचार करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने तज्ज्ञांची समितीही नेमली होती. त्या समितीनेही आरेलाच पसंती दिली होती.हा प्रकल्प हलविल्यास खर्च वाढेल आणि प्रकल्पाला उशीर होईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मुंबईकरांनाच त्रास सहन करावा लागेल असंही फडणवीसांनी म्हटलं होतं.या आधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!