महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

28 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक नोंद झाली आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. राज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा 14 हजार 364 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता