राजकारण

फडणवीस येताच बिळात असलेले नेते बाहेर येतात!

28 Aug :- भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस कोल्हापुरात येताच बिळात बसलेले अनेकजण बिळातून बाहेर पडतात, अशी खोचक टीकाग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.त्यामुळे उद्या फडणवीस मुश्रीफ यांच्या टीकेला काय उत्तर देतात?, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागलेआहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी ही टोलेबाजी केली. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना मंदिर आणि मशीद खुले करा म्हणणारे भाजप आणि एमआयएम हे हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. सध्या राज्यात करोना बधितांचा आकडा रोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये अनेकांचा बळी जात आहे. अशावेळी मंदिर आणि मशीद खुले करणे योग्य नाही. तरीही भाजप आणि एमआयएमकडून याबाबत मागणी होत आहे.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

असे झाल्यास करोनाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे या हातात हात घालून काम करणाऱ्या पक्षांना मी हात जोडून सांगतो, आपण मंदिर, मशीद उघडूया. त्यासाठी थोडं धीर धरा, असं आवाहनही त्यांनी केलं.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, भाजपने मंदिर खुले करण्यासाठी घंटानाद करण्यापेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अलमट्टीची उंची आणि शिवाजी महाराजांचा पुतळा याबाबत कर्नाटक सरकार बरोबर चर्चा करावी.

हे वाचा :- कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना भेटून तसा प्रस्ताव द्यावा. प्रसंगी तेथे जाऊन घंटानाद आंदोलन करावे. वेळ पडल्यास या आंदोलनात आपणही ही सहभागी होऊ, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच आता उद्या फडणवीस येणार असल्याने बिळात बसलेले अनेकजण बिळातून बाहेर येतील अशी टीकाही त्यांनी केली.

हे वाचा :- विचित्र घटना! कोरोनाची धास्तीने गावकरी झाले गायब