भारत

विचित्र घटना! कोरोनाची धास्तीने गावकरी झाले गायब

28 Aug :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूची वेगाने वाढणारी आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.कोरोनाच्या धास्तीने अनेक हरिणकाळजी माणसांनी आत्महत्या देखील केल्या घटना समोर आल्या आहेत.कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनाच्या भीतीने येथील खतौली भागातील गुवाडी गावातील 90 टक्के घरांवर टाळं लागलं आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असताना गावकऱ्यांमध्ये याची भीती निर्माण झाली आहे. या गावातून लोक गायब झाले आहेत. जेव्हा आज दुपापी 1:30 वाजता इटावा ब्लॉकचे सीएमएचओ मेडिकल टीम घेऊन ग्रामीण भागात रँडम सॅंपल घेण्यासाठी गावात पोहोचले तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

गावात मोजकेच लोक शिल्लक राहिले आहेत. त्यांनी सांगितले की लोक आज पहाटे 4 वाजता गायब झाले, त्याकारणाने त्यांच्या घराबाहेर टाळं लागलं आहे. गावकऱ्यांकडून ही बाब ऐकल्यानंतर मेडिकल टीम आणि ब्लॉक सीएमएचओ डॉ. यादवेंद्र शर्मा चकीत झाले. डॉ. यादवेंद्र शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट रोजी गुवाडी गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गावात 21 ऑगस्ट रोजी तब्बल 40 लोकांचे सँपल घेण्यात आले होते.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

त्यानंतर गावातील 11 व्यक्ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मेडिकल टीमने 7 जणांना तत्काळ कोटा न्यू मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भर्ती केलं होतं. मात्र चार महिला आपल्या घरातून गायब झाल्या. त्यानंतर इटावा उपखंडचे अधिकारी राम अवतार बरनाला यांनी त्यांना समज देत रुग्णालयात भर्ती केलं होतं.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!

आज जेव्हा मेडिकल टीम कोणतीही सूचना न देता गावात कोरोना सँपल घेण्यासाठी पोहोचले तर गावकऱ्यांनी आपल्या घराला टाळं लावलेलं होतं. शेतातही गावकरी काम करताना दिसले नाहीत. आतापर्यंत या गावात 12 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहेत.

हे वाचा :- कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!